Sunday 20 March 2016

आईशी खूप बोलायचंय


पलिकडल्या पिंट्याचे वडील
त्याच्या आईला रोज मारतात..
माझे बाबा मुळीच तसे नाहीत
माझ्या आईवर किती प्रेम करतात..!

रागावतही नाहीत कधीच
तिला हवं ते आणून देतात
कधी कसली तक्रार नाही
घरकामातही मदत करतात..

तिला जायचं असेल तिथे
स्वतः नेऊन सोडतात
बसचा त्रास नको म्हणून
परत आणायलाही जातात..

माझी आई आहे तशी छान
पण तिला काय वाटतं कळत नाही
सगळं छान असूनही
तिची कळी काही खुलत नाही

येता जाता चिडत असते सारखी
बाबांची मदत तिला मदतच वाटत नाही
सगळ्यांचं घर, त्यातलं कामही सगळ्यांचं
मदत कसली? जर केलं त्यातलं काही..!

सोडायला..  घ्यायला जातात बाबा
ते तर तिला आवडतच नाही
नसती काळजी घेणं
तिला मुळीच पटत नाही...

एकदा मला आईशी खूप बोलायचंय
आठ मार्चला तिच्याबरोबर जायचंय
काय म्हणत असतात सार्‍याजणी
एकदा नीट ऐकायचंय...!

***

No comments:

Post a Comment