Sunday, 20 March 2016

क्लासची भानगड नको बाई


गाण्याचा क्लास नको ना आई
नाचाच्या क्लासची कशाला घाई

झाडावर पक्षी गात असतात
त्यांना कुठे क्लास असतात
नुसती शाळा बास बाई
गाण्याचा क्लास नको ना आई

ढग मजेत फिरत असतात
रंगांबरोबर नाच करतात
त्यांचं काही अडत नाही
नाचाच्या क्लासची कशाला घाई ?

कोणताच क्लास नसेल तर
खेळता येईल घरभर
घाई गडबड उडणार नाही
क्लासची भानगड नको ना आई

नाचत गात खेळत राहीन
अभ्यास करून मोठी होईन
तोवर थोडं थांब ना आई
मोठं व्हायची कशाला घाई ?
***

No comments:

Post a Comment