Sunday, 20 March 2016

पुस्तक सोबत करते


एकटीला ठेवुन मला
सगळी बाहेर गेली
अख्खा टी. व्ही. पाहुन झाला
तरी नाही आली

काय करू सुचेना
फोन करून झाले
वाट पाहून दमले तरी
कोणी नाही आले!

अभ्यासाला सुट्टी होती
दप्तर गप्प होते
बक्षिसाचे पुस्तक त्यातून
हळुच डोकवत होते

धावत जाऊन घेतले पुस्तक
चित्रं होती मस्त
गोष्टी सुद्धा मस्त होत्या
वाचून केल्या फस्त

पुस्तकाशी झाली दोस्ती
खूप मजा आली
वाट बघण्याआधीच सगळी
घरी परत आली

कळले मला पुस्तकात
सर्व काही असते
हवी तेव्हा हवी तशी

पुस्तक सोबत करते !
***

पूर्वप्रसिद्धी- छात्रप्रबोधन दिवाळी अंक

No comments:

Post a Comment