Sunday, 3 April 2016

खूप सारे आबा आजी

१४ नोव्हेंबर २०११ रोजी  ‘ऋतुचक्र’ या माझ्या बालगीत संग्रहाच्या प्रकाशनाच्या  वेळी आदित्य लेले (आमचा नातू, वय वर्षे ९) याने स्वतः चाल लावून त्यातले एक बालगीत गायले. त्याची ऑडिओ लिंक-

https://soundcloud.com/asavarikakade/r3elheo29qfz

या बालगीताचे शब्द-

खूप सारे आबा आजी
रोज बागेत जमतात
गोल करून आपल्यासारखे
मस्त टाळ्या पिटतात

कमरेवरती हात ठेवून
विठ्ठल विठ्ठल म्हणतात
मोठी जीभ बाहेर काढून
मोठा आवाज करतात

पाठ म्हणतात बाराखड्या
हातवारे करून
हसता हसता खोकू लागतात
पोट धरुन धरून

एक आबा म्हणतात पाढे
त्यावर सारे नाचतात
नाकावरती हात ठेवून
सूं सूं आवाज काढतात

कुणी पी जे सांगत नाही
तरी खो  खो हसतात
डेक्कन क्वीन खेळतात कधी
कधी बाण सोडतात

सात मजली हसून सगळे
डोक्यावर घेतात बाग
हसता हसता त्यांचा म्हणे
पळून जातो राग

बागेत जायला लागल्यापासून
आबा झालेत लहान
दंगामस्ती केली तरी
धरत नाहीत कान..!

(‘ऋतुचक्र’,  ‘कजा कजा मरू प्रकाशन, गरवारे बालभवन, पुणे)


No comments:

Post a Comment